लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चोपडा म्हटलं म्हणजे राष्ट्रवादीचा गड परंतु अलीकडे लोकसभेला भाजपा आणि विधानसभेला राष्ट्रवादी असे समीकरण असते परंतु जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय फार्मूला नुसार चोपडा ची जागा ही काँग्रेसला सोडण्यात आले आहे त्यामुळे आघाडीतील मित्रपक्ष ही अनुकूल झाले परंतु राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपाचे घनश्याम अग्रवाल हे उमेदवार असतील यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने सर्वपक्षीय पॅनल वादात सापडले आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल चे वारे वाहत असताना चोपडा नेहमी उलट्या दिशेने चालते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्थानिक असतानादेखील या ठिकाणी अनेकवेळा भाजपाला रसद पुरवली स्थानिक नेत्यांकडून झाले असल्याचे अनेक निवडणुकीच्या मतदान वरून दिसून येते. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लीड चोपडा तून भाजपाला असते. तसेच विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत देखील चोपडा येथील ज्येष्ठ नेत्याच्या सुनेने फडवणीस सरकारच्या काळात भाजपप्रणित पॅनल कडून निवडणूक लढविली होती. त्याकाळात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराला देखील चोपडा येथून राष्ट्रवादीचे मतदान मिळाले नव्हते. हा इतिहास ताजा असताना अनेक तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत देखील राष्ट्रवादीने अशीच आहात म्हणून भाजपच्या त्या ठिकाणी झाले आहे.
असो परंतु आता महा विकास आघाडीचे ताकत असताना भाजपाचे घनश्याम अग्रवाल यांना राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी रसद पुरवण्याचे कारण काय? मित्रपक्ष काँग्रेसला ही जागा सुटली असताना भाजपाला मोठे करण्याचे काम जर ज्येष्ठ नेते करीत असतील हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही .काँग्रेस वेगळा मार्ग जिल्हा बँक निवडणुकीत शोधण्याच्या मनस्थिती दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जागेवर आहेत परंतु ज्येष्ठ नेते जर फितुरी होत असतील तर राष्ट्रवादी चे भविष्य काय राहील हे आतापासूनच दिसून येते.
विधानसभा निवडणुकीत देखील जगदीश वळवी यांच्या निवडणुकीचा पराभवाचे कंगोरे देखील असेच आहेत. चोपडा विकास सोसायटी मतदारसंघाची जागा जर काँग्रेस कडून घेऊन भाजपाचे घनश्याम अग्रवाल यांना दिली तर जिल्ह्यात हा संदेश वेगळा तर जाईल परंतु जिल्हा बँक निवडणुकीत सर्व जागांवर याचे परिणाम राष्ट्रवादीला लवकरच दिसतील कारण सहकारात राजकारण नसते असे म्हटले जाते म्हणून आपोआपच भारतीय जनता पार्टीला महाविकासआघाडी तून काही नेत्यांची रसद पुरवली जाऊ शकते यात काँग्रेस शिवसेना अपवाद नव्हे हे विशेष.