जळगाव : प्रतिनिधी
ऐनपूर येथील वर्षानुवर्षे चालत आलेली बारागाड्या ओढण्याची परंपरा कोरोना काळ वगळता यंदाही कायम ठेऊन ऐनपूर येथील बारीघाट ते मरिमाता मंदीर बारागाड्या ओढण्यात आल्या. परंतु यात बारगाड्यांचा ताबा सुटल्याने एक जणाचा मृत्यू तर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले.
ऐनपूर येथे बारागाड्या ओढण्याची परंपरा ही जुनी असून वर्षानुवर्षं येथे बारागाड्या हे ओढण्यात येत असतात, परंतु संपूर्ण देशात कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने कोरोना काळ वगळता ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली होती. अक्षय तृतीयेच्या दुसर्या दिवशी या बारागाड्या ओढण्यात येतात, अक्षयतृतीया निमित्त दि.23 एप्रिल रोजी ऐनपुर येथील बारिघाट येथे या बारागाड्या ओढण्यात आल्या.
परंतु त्या ओढत असताना गाड्यांचा ताबा सुटल्याने भगत सोपान नामदेव भिल यांचे सह भगतीन मंगलाबाई प्रकाश भिल, सुभाष भील, ईश्वर भील, नामदेव भील, किशोर हरी पाटील, मोहन एकनाथ महाजन, तर बगल्यांमधे सुनील राजाराम महाजन सचिन कैलास महाजन तसेच ज्यु ओढणारे नारायण शामराव महाजन, ईश्वर रूपा भिल्ल, हे किरकोळ जखमी झाले. तर प्रेक्षकांमधून दिनकर रामकृष्ण कोळी (वय 60) यांना जास्त मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता त्यांना मृत घोषित केले. तर बाकी जखमींवर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. घटना बारागाड्यांवरील ताबा सुटून गाड्याचा मोहरा फिरल्याने गाड्यांची दिशा बदल्याने मंदिराच्या पायरी जवळ घडली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी दिनकर कोळी यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय रावेर येथे नेले परंतु त्या ठिकाणी उपचारा दरम्यान मृत घोषीत करण्यात आले. यावेळी निंभोरा पोलीस स्टेशन चे स.पो.नि. गणेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार झानेश्वर चौधरी, योगेश चौधरी, नितिन पाटील आणि गृहरक्षक दलाचे जवान यांती चोख बंदोबस्त ठेवला.