जळगाव : प्रतिनिधी
पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेत शिंदे गटाच्या पदाधिकारी गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून घुसणार होते. तर शिंदे गटाचे पदाधिकारी जळगाव शहरातून शेकडो कार्यकर्ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगावातून पाचोऱ्याच्या दिशेने निघाले असता त्यांना पोलीस प्रशासनाने शिरसोली रोडवर त्यांचा ताफा अडवला होता. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, स्व.आर.ओ.तात्या पाटील हे माझे चांगले मित्र होते. आ.किशोर पाटील यांचे काका होते. त्यांच्या कार्यक्रमाला विरोध नाही. आम्हाला फक्त संजय राऊत हा माणूस महाराष्ट्रात काही हि बोलत आहे. मी फक्त सांगितले कि, सभेत काही हि बोलू नका आमचे इतकच म्हणणे आहे. पण ते स्वतःह म्हणत आहेत कि, या सभेत घुसा आणि दगड मारा असे ते स्वतः म्हणत आहेत. आम्ही पुतळ्याच्या कार्यक्रमाला विरोधच नाही. आम्हाला सभा कशा बंद पाडता येतात पण उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना दूर केले पाहिजे. माझ्यावर त्यांनी आरोप केले ४०० कोटी रुपयांचा तीन वर्षात १२० कोटी दिले होते. त्याच्यातील ९० कोटी त्याच्यातून ८५ कोटी फक्त खर्च केले आहे.