जळगाव : प्रतिनिधी
पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेत शिंदे गटाच्या पदाधिकारी गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून घुसणार होते. तर शिंदे गटाचे पदाधिकारी जळगाव शहरातून शेकडो कार्यकर्ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगावातून पाचोऱ्याच्या दिशेने निघाले असता त्यांना पोलीस प्रशासनाने शिरसोली रोडवर त्यांचा ताफा अडवला होता.
यावेळी पाचोऱ्याचे आ.किशोर पाटील व पोलीस प्रशासनाने शिंदे गटाचे पदाधिकारी याच्याशी मध्यस्थी करीत शिंदे गटाचे पदाधिकारीना पुन्हा जळगावच्या दिशेने माघारी फिरवले आहे. त्यामुळे आता पाचोऱ्यातील उद्धव ठाकरे यांच्या सभेला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यासह सरीता माळी-कोल्हे, पवन सोनवणे, जितेंद्र गवळी, गणेश सोनवणे, कुंदन काळे, सोहम विसपुते, नवनाथ दारकुंडे, श्याम कोगटा, मनोज पोकळे यांच्यासह कार्यकर्ते माघारी फिरले आहे.