मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी तसंच भाऊ धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या संबंधांवर भाष्य केलं आहे.
मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मनोमिलनाच्या बातम्या येत आहेत. हे दोघं बहिण भाऊ एकाच व्यासपीठावरही एकत्र दिसले. मनोमिलनाच्या या चर्चांवर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. ‘ही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये मी उभी राहिली आहे. माझ्या समोरचे उभे राहिले आहेत. जे कोणी उभं राहिल, त्यांचा प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. कॉलेच चालवणं सोपं नाही, त्या ठिकाणी मुलं मुली येतात, त्यांचं भविष्य आणि सुरक्षितता महत्त्वाची असते,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ‘मनोमिलनाची प्रतारणा माझ्याकडून झाली नाही. मी त्यांच्या विरोधात काहीच वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही. भ्रष्टाचाराच्या संदर्भात कुणीही बोलू नये, असं मला वाटतं. माझा कारभार सगळ्यांच्या समोर आहे. माझ्यावर उपकार करण्यासाठी ते राजकारणात नाहीत.
असते तर टीका केली नसती,’ असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला. ‘पंकजा मुंडे एकवचनी आहेत, मी त्यांच्याविरोधात काहीच बोलले नाही. एकदा शब्द दिला की मागे फिरत नाही. मी जर एखादी भूमिका जाहीरपणे मांडली तर त्याच्या मागे गेले नाही. मी वैयक्तिक आरोप केले का?’, असा प्रश्न पंकजा मुंडेंनी विचारला. बीडच्या परळी येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणूकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. या अगोदर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचीदेखील या शिक्षण संस्थेवर बिनविरोध सभासद म्हणून निवड झाली आहे. शिक्षण संस्थेच्या निवडणुकीमध्ये बहीण-भावांची दिलजमाई झाल्याचं स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केलेले सदाशिव आप्पा मुंडे यांचे नातेवाईक बालाजी गिते यांनी माघार घेतली आहे, यामुळे पंकजा मुंडे बिनविरोध निवडून आल्या. भूकंपाबाबत पंकजांना चिंता महाराष्ट्रात एवढे भूकंप झाले तर महाराष्ट्रचं काय होईल, याची मला चिंता आहे. महाराष्ट्रचं राजकारण कसं राहील, याची मला चिंता वाटते. भूकंपाचे कोणतेही संकेत मला असण्याचं कारण नाही, कारण मी या प्रक्रियेचा कुठलाही भाग नाही, त्यामुळे मी यावर भाष्य करू शकणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.