जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात दोन दिवसापासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठाण मांडले आहे तर त्यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना थेट आव्हान दिले आहे सभेत तुम्ही घुसून दाखवा त्यावर आता शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. या सभेत शिंदे गटाचे शेकडो शिवसैनिक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या चेहऱ्याचा मुखवटा धारण करून जाणार आहेत.
त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यासह सरीता माळी-कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत रविवारच्या ठाकरे यांच्या सभेत शेकडोंच्या संख्येने जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी गुलाबराव पाटील यांच्या चेहऱ्याचे मुखवटे छपाईसाठी देण्यात आले आहेत. सुमारे २५० चारचाकी वाहनातून शिवसैनिक पाचोऱ्याला जाणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. त्यामुळं आज पाचोरा शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.