महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज – लक्ष्मणराव पाटील
धरणगांव प्रतिनिधी: येथील अ.भा.जिवा सेना व शहरातील नाभिक समाज बाधवांतर्फे शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त गुजराथी गल्ली येथे प्रतिमा पूजन व जिवाजी महाले यांचे जीवनपट यावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत सेवक जिवाजी महाले होते. असे प्रतिपादन महात्मा फुले हायस्कूल चे उपक्रमशिल शिक्षक पी. डी. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. जिवा सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. बी. एल. खोंडे होते. या जयंती महोत्सवानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. जिवा सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. बी. एल. खोंडे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भाजपा गटनेते कैलास माळी सर, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, नगरसेवक सुरेश महाजन, जेष्ठ नागरिक शशिकांत गुजराथी, रा. ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, मराठा नाभिक समाजाचे अध्यक्ष अशोक झुंजारराव, अ.भा.जिवा सेनेचे धरणगाव ता.अध्यक्ष रविंद्र मधुकर निकम, शहराध्यक्ष अमोल भास्कर महाले, तृप्ती हॉटेलचे संचालक प्रथम सूर्यवंशी, राजे छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष नामदेव मराठे, ईच्छाकृपा कॉम्प्युटर चे संचालक चेतन जाधव, डी. एन.आहिरे, विशाल (पप्पू) पाटील, सुरेश सोनवणे, प्रफुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज , संत शिरोमणी सेना महाराज व शिवरत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जिवाजी सेना यांच्यातर्फे सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जिवाजी महाले यांच्या जीवनावरील व्याख्यानाला सुरुवात झाली. यावेळी व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी शिवरत्न, नरवीर जिवाजी महाले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सांगितले की, जिवाजी हे शिवरायांच्या निष्ठावंत मावळ्यांपैकी एक होते. प्रतापगडावर झालेल्या अफझलखानाच्या भेटीप्रसंगी त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांवर होणारा वार आपल्या अंगावर घेतला व सय्यद बंडाला जिवाजींनी ठार करून शत्रूपासून महाराजांचे रक्षण केले. यामुळेच छत्रपतींनी अफझलखान व कृष्णा भास्कर कुळकर्णी सारख्या देशद्रोहींचा खात्मा केला.
याच प्रसंगातुन “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” ही म्हण रूढ झाली. छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना अठरा अलुतेदार व बलुतेदारांना सोबत घेऊन सर्वांना मावळा अशी ओळख दिली. व “स्वराज्य म्हणजे आमच्या सर्वांचे राज्य” स्थापन केले. तसेच, व्याख्याते पाटील यांनी रायगड, प्रतापगड, शिवाजी काशीद यांचा दाखला दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय महाजन व कैलास माळी सरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची स्तुती केली. शिवरत्न जिवाजी महालेंना वंदन करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बी.एल. खोंडे यांनी महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा संदेश उपस्थितांना दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोपान वारुळे, सचिन झुंजारराव, आकाश झुंजारराव, गणेश निकम, निलेश कुवर, शुभम सोनवणे, आकाश कुवर, विक्की निकम, महेश फुलपगार, किरण बिरारी, दिपक बोरसे, हितेश ठाकरे, विक्की बोरसे, भानुदास झुंजारराव, सागर झुंजारराव, संजू झुंजारराव, सुनिल झुंजारराव, कैलास पाटील, दुष्यंत अहिरे, सागर महाले, भूषण वारुळे, विशाल झुंजारराव, भावेश झुंजारराव, कृष्णा झुंजारराव, केतन झुंजारराव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी सर्व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. कृष्णा टेंट हाऊसचे संचालक उज्वल महाले यांच्याकडून साउंड व टेंट चे अनमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कुल चे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील सरांनी केले.