रावेर : प्रतिनिधी
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत असतांना पोलिस स्टेशनच्या गस्तीवर पथकाला विनाक्रमांकाच्या सहा मोटारसायकली संशयास्पद स्थितीत आढळून आल्या. याबाबत चार जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद अनिल गाढे (३०), नईम खान रमजान खान (५०), शेख आहद शेख आरिफ (२५, तिघे रा. विवरे बुद्रुक ता. रावेर), शेख जफर शेख उस्मान (३५, रा. मदिना कॉलनी, रावेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या मोटारसायकली छत्रपती संभाजीनगर, भुसावळ व सावद्यासह अन्य ठिकाणांहून चोरून आणल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची किंमत ८० हजार रुपये आहे. रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार विशाल सोनवणे, इस्माईल शेख, पो.हे.कॉ. भागवत धांडे, सुरेश मेढे, सचिन घुगे, समाधान ठाकूर, विकार शेख, अमोल जाधव, सुकेश तडवी, प्रमोद पाटील, विशाल पाटील, विष्णू भिल्ल यांच्या पथकाने कारवाई केली