रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील २१ वर्षीय तरुणीचा ३० वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादी वरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील २१ वर्षीय तरुणी दि २० रोजी एका सार्वजनिक शौचालयात जात असतांना संशयित आरोपी शेख सद्दाम शेख (वय ३०) याने तरुणीचा पाठलाग करीत तिचा हात पकडून तिला म्हणाला कि, तु मुझे अच्छी लगती है, ये मेरा मोबाईल नंबर चिट्ठी पे लिखा है ये ले चिट्ठी असे बोलून व यापूर्वी देखील तरुणीस पाहून वेळोवेळी इशारे करून मनास लज्जा उत्पन्न केल्या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिसात संशयित आरोपी शेख सद्दाम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.बापू पाटील हे करीत आहेत.