लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नाशिक परिक्षेत्राच्या आय जी यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री ब्राऊन शुगर तस्करी करणाऱ्या एका आरोपीला हॉटेल परिसरातून अटक केली याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणातील अजून धागेदोरे समोर येतील आरोपी हा जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराचा आहे.
नाशिक परिक्षेत्राचे आईजी यांच्या विशेष पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की ,जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील पंचशील नगर मधील 43 वर्षाचा एक किसन ब्राऊन शुगर तस्करी करीत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे या विशेष पथक व धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस यांच्या मदतीने शनिवारी रात्री 9 वाजेला भुसावळ येथील पंचशील नगर मधील रहिवाशी सैय्यद शेर सैय्यद बुडन या आरोपीला हॉटेल परिसरातून ताब्यात घेतले आहे त्याच्या कडून अर्धा किलो ब्राऊन शुगर तिची किंमत 7 ते 8 लाख रुपये आहे ती जप्त करण्यात आली आहे .