मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राजकारणात गेल्या आठ दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार सातत्याने चर्चेत आलेले आहे. ते नॉट रिचेबल झाल्यापासून सत्ताधारीसह विरोधकांचे धाबे दणाणले होते. पण ज्यावेळी अजित पवार माध्यमासमोर आल्यानंतर सर्व काही उलगडले. तेव्हा पक्ष फुटीच्या चर्चानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सर्व आमदारांना फोन करत विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे राज्यात कुठेतरी राजकारणात वेगवान हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याचा चर्चानंतर अजित पवारांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले होते की, जीव गेला तरी शेवटपर्यत राष्ट्रवादीसोबत राहिन. मात्र, दि.१९ एप्रिल रोजी सकाळपासून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी भेट घेतली. यामुळे शरद पवारांनी सावध पवित्रा घेतला असून पक्षातील प्रत्येक आमदारांना वैयक्तिक फोन करत चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.तसेच अजित पवारांनी दि.१९ एप्रिल रोजी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणावर भेट घेत चर्चा केली त्यामुळे कदाचित खासदार शरद पवारांना सर्व आमदारांना फोन करत विचारपूस करावी लागत होती.
अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी अजित पवारांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहिल असे स्पष्ट केले आहे. यात आता शरद पवारांनी आमदारांना फोन करत पक्षचे ध्येय धोरण, पुढील वाटचाल, निवडणुकांसाठी रणनीती यांसारख्या अनेक मुद्द्यांवर आमदारांशी चर्चा केली जात आहे. तसेच बंडाबाबतच्या चर्चांवरही भाष्य करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.