प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे 8 ऑक्टोबर रोजी बौद्धिक संपदा अधिकार(IPR) या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यशाळेसाठी प्रा डॉ एम डी शिरसाट संचालक रुसा सेंटर इलेक्ट्रॉनिक विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद हे लाभले यांनी बौद्धिक संपदा अधिकार या विषयावर बोलताना पेटंट व कॉपीराईट्स संदर्भातील प्रोसिजर पेटंट धारकांचे अधिकार पेटंट मिळवताना अविष्कार कशा पद्धतीचे पाहिजेत विशेषतः संदर्भ पुस्तके व या पुस्तकांवर मिळणारी मिळकत म्हणजेच रॉयल्टी कशा पद्धतीने मिळते व ती किती काळापर्यंत मिळत राहते प्रकाशक संशोधकांची कशी फसवणूक करू शकतात त्यातील माहिती त्यांनी सहभागी संशोधकांना उत्कृष्ट मांडणी द्वारे सांगितले नवीन संशोधकांना पेटंट फाईल कसे करायचे रॉयल्टी कशी मिळवायची यासंदर्भात माहिती देत असतांना सहभागी अभ्यासकांचा उत्प उस्फुर्त प्रतिसाद लाभला 676 सहभागी अभ्यासकांनी नोंदणी केली होती.
सदर ऑनलाइन कार्यशाळा झूम मीटिंग यूट्यूब चैनल व फेसबुक अकाउंट वर सुद्धा अभ्यासकांनी ऐकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संदीप पालखे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ धम्मज्योती गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अभिजित जोशी यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी परा हाय सोसायटीचे मा अध्यक्ष साहेब सर्व या. संचालक मंडळ मा प्राचार्य साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ स्वप्नील खरे डॉ विश्वजीत वळवी हर्षल भालेराव डॉ गौरव महाजन व सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.