जळगाव : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर महावितरणच्या कार्यालयातील टेक्नीशीयनसह खाजगी पंटराला जळगाव एसीबीने दिड हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास फत्तेपूर येथे वीज कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात करण्यात आली. सिनी.टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार व खाजगी ईसम कलीम तडवी अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
जळगावातील तक्रारदाराचे जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे पत्र्याच्या शेडमध्ये घर असून तेथे वीज मीटर देण्यासाठी संशयितांनी यापूर्वीच दोन हजार रुपये डिमांड नोटसाठी घेतले होते मात्र मीटर लावून देण्यासाठी दिड हजार मागितल्यानंतर बुधवारी एसीबीकडे तक्रार नोंदवताच सापळा रचण्यात आला. खाजगी इसमासह टेक्नीशीयने लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलिस उप अधीक्षक श्री.शशिकांत पाटील, संजोग बच्छाव, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर