जळगाव : प्रतिनिधी
रामानंद नगर पोलीस स्टेशन जळगाव हददीत पिंप्राळा आठवडा बाजार परीसरातुन तसेच महाबळ परीसरातील छत्रपती संभाजी महाराज नाटयगृह जवळील बाजार परीसरातुन दि. ०७/०४/२०२३ व दि.१३/०४/२०२३ रोजी अज्ञात चोरटयांनी मोबाईल जबरीने हिसकल्यावरुन रामानंद नगर पोलीस स्टेशन जळगाव येथे गुरनं ११० / २०२३ भादवि ३९४, ३४ व गुरनं ११८ / २३ भादवि ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची आरोपींची सखोल चौकशी केली असता. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, जळगाव भाग जळगाव यांचे मागर्दशन व आदेशाप्रमाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नजन पाटील नेम स्थागुशा जळगाव यांचे मदतीने पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील यांनी प्राप्त माहीतीचे आधारे तपास चक्रे गतिमान केली. नमुद गुन्हयाचे तपासकामी पथकाची नेमणुक करण्यात आली, दोन्ही गुन्हयांचे तपास पथकास मा.पोलीस अधीक्षक सो जळगाव यांचे आदेशाप्रमाणे बाहेर जिल्हयात पाठविले असता, गुन्हयातील एकुण ०४ आरोपीसह ०६ विधीसंघर्षीत बालके सर्व राहणार झारखंड यांना ताब्यात घेतले असुन व एकुण ४२ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. नमुद सर्व आरोपी हे बाहेर राज्यातील असुन संपुर्ण राज्यात लहान बालकांना हाताशी घेवुन मोबाईल चोरी व जबरी चोरीचे प्रकार करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नमुद गुन्हयाचा तपासात ०४ आरोपी व ०६ विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले असुन एकुण ४२ मोबाईल हस्तगत केले आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली व वरीष्ट पोनि नजन पाटील स्थागुशा जळगाव यांचे मदतीने मा. पोनि श्रीमती शिल्पा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि गोपाल देशमुख हे करीत असुन, गुन्हयाचे तपास पथकात सपोनि रोहीदास गभाले, पोह.संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पोना.रेवानंद साळुंखे, पोशि.रविंद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, चंद्रकांत पाटील, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोननी, दिपक वंजारी, चापोशि.संतोष पाटील आदींनी सहभाग घेतला असुन तपासाचे व्यवस्थित नियोजन करुन मोठ्या शिताफीने वरील नमुद सर्व आरोपींना मुददेमालासह ताब्यात घेवुन आंतरराज्यीय टोळीस उघडकीस आणले आहे.