• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरट्यांनी देवाला देखील सोडले नाही अन घेतली गोदापात्रात उडी !

editor desk by editor desk
April 19, 2023
in क्राईम, राज्य
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

नाशिक : वृत्तसंस्था 

राज्यात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढले आहे. आता मात्र चोरट्यांनी देवाला सुद्धा सोडले नसून देवाचे सुद्धा दागिने लंपास करण्यात चोरटे मागचा पुढचा विचार करीत नाही. अशीच एक घटना नाशिकमध्ये रविवार कारंजा येथील प्रसिध्द चांदीचा गणपती मंदिरातून चोरी करून सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी करणा-या परप्रांतीय चोरट्यास सरकारवाडा पोलिसांनी गजाआड केले आहे. हा चोर पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना सराफ बाजार पोलिस चौकीतील कर्मचा-यांच्या नजरेत आला. पण, या चोराने रात्रीच्या वेळी गोदापात्रात उडी घेतली. पण, पोलिस पथकाने त्यास हुडकून काढत त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निहाल उदयभान यादव (२१ मुळ रा. मध्यप्रदेश, हल्ली अमृत दुग्धालय सरदार चौक, पंचवटी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. रविवार कारंजा येथील प्रसिध्द चांदीचा गणपती येथे रविवारी (दि.१६) ही घटना घडली होती. मंदिरातील मुख्यदरवाजाची काच फोडून संशयित मुर्तीच्या दिशेने अंगावरील दागिणे चोरण्यासाठी जात असतांना आवाज ऐकून धाव घेतलेल्या नारायण नामदेव हाके या सुरक्षारक्षकाच्या डोक्यात त्याने लोखंडी रॉडमारून जखमी केले होते.
सुरक्षा रक्षक जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळताच संशयिताने गणपती मुर्तीवरील दोन चांदीचे हार काढून धुम ठोकली होती. मात्र गंगावाडीच्या दिशेने तो पळत सुटल्याने ही बाब सराफ बाजार पोलिस चौकीत बसलेले पोलिस कर्मचारी शामराव अहिरे व बालाजी गिरी यांच्या नजरेस पडली. कुठलीही माहिती नसतांना दोन्ही कर्मचा-यांनी विलंब न करता संशयिताचा पाठलाग केला. पोलिस पाठीमागे लागल्याचे लक्षात येताच संशयिताने गोदावरी नदी पात्रात उडी घेतली.

या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविण्यात आल्याने सहाय्यक निरीक्षक यतीन पाटील,पोलिस नाईक नितीन थेटे, शिपाई नाजीम शेख, पवन पगारे, विश्वजीत राणे, संदिप सावळे व चालक रविंद्र पठारे आदींच्या गस्ती पथकाने गोदाघाट गाठून संशयिताला पाण्याबाहेर काढले. चौकशीत त्याने गणपती मंदिरात सुरक्षा रक्षकावर हल्ला करीत चोरी केल्याची कबुली दिली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.

Previous Post

देशात अवघ्या २४ तासात कोरोनाचे हजारो रुग्ण !

Next Post

रामानंद नगर पोलीसांनी केला आंतरराज्यीय मोबाईल चोर टोळीचा पर्दाफाश !

Next Post
रामानंद नगर पोलीसांनी केला आंतरराज्यीय मोबाईल चोर टोळीचा पर्दाफाश !

रामानंद नगर पोलीसांनी केला आंतरराज्यीय मोबाईल चोर टोळीचा पर्दाफाश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group