वार्ताहर भाईदास पाटील: धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथे सालाबादाप्रमाणे दोन गाव एक दुर्गा देवी नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.बोरगाव गावातील सर्वांचे प्रेरणास्थान असणारे कै,सजन आनंद सोनवणे यांच्या प्रेरणेने व त्यांच्या स्मरणार्थ बोरगाव खु.येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नवरात्र उत्सव निमित्ताने गावात कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक ७ रोजी पासुन कीर्तनाला सुरूवात होणार असून १४ रोजी कीर्तन कार्यक्रमाची सांगता होणार आहे ह.भ.प चंद्रकांत महाराज आर्थेकर,शिवशाहीर गोपाल महाराज चिमठाणेकर,गोविद महाराज पाचोरेकर,जनार्दन महाराज आर्वीकर,रवींद्र महाराज तार खेडेकर,अनंतजी महाराज,शिवाजी महाराज बाविस्कर,जगन्नाथ महाराज बागले(सर)यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमानिमित्ताने गावातील मंदिर व्यवस्थापनाने भाविक भक्तांसाठी १७ रोजी महाप्रसादाचे आयोजन देखील केले आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी ग. भा.भिकुबाई सजन सोनवणे,ग.भा.ज्योती विलास सोनवणे,चि.दिगंबर विलास सोनवणे,चि.चेतन विलास सोनवणे व समस्त सोनवणे परिवार बोरगाव खु.आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे सोनवणे परिवाराकडून विनम्र आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जलदुर्ग मित्रमंडळ बोरगाव,हरिविठ्ठल मित्रमंडळ,जयदुर्गा रिक्षा स्टॉप बोरगाव,कै.आनंदा सोमा सोनवणे अनुदानित आश्रमशाळा सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,गणेश मित्र मंडळ,एकवीरा मित्रमंडळ,जय बजरंग मित्रमंडळ,बोरगाव,जयं अबे साऊंड सिस्टीम टाकरखेडा यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.