अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील खाजा नगर भागातील एका १५ वर्षीय तरुणीला १७ रोजी तर तालुक्यातील सोनखेडी येथील एका १७ वर्षीय मुलीस 15 एप्रिल रोजी पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील सोनखेडी येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस १५ रोजी रात्री घरात झोपलेली होती. मात्र रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास तिच्या आईला ती दिसून आली नाही.तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्यामुळे अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून पळवून नेले आहे. परिवाराने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.
तर दुसरी घटना शहरातील खाजा नगर भागातील बंगाली फाईल येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही १७ रोजी सकाळी साडे तीन वाजता बाथरूमला जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर निघाली मात्र बऱ्याच वेळानंतर परत न आल्याने तिला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असून परिवाराने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिलदेव पाटील करीत आहेत.