जळगाव : प्रतिनिधी
शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उतार्यावर शेतकर्याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ सजाचे कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे (54, रा.भुसावळ) व खाजगी कर्मचारी हरी देविदास ससाणे (44, रा.आंबेडकर नगर, भुसावळ) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि,, कुर्हेपानाचे भागातील तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार दिली होती. शेतीची नोंद सातबारा उतार्यावर घेण्यासाठी त्यांनी मंडळाधिकार्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कोतवालांना भेटण्यास सांगितल्यानंतर रवींद्र धांडे यांनी 12 हजारांची लाच मागितली मात्र लाच द्यावयाची नसल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी कोतवालाने खाजगी पंटराकडे लाच देण्याचा इशारा केल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्यासह स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल पाटील पो.कॉ.राकेश दुसाने , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांनी ही कारवाई केली. एसीबीच्या कारवाईनंतर तहसील कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली.