जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका अपाटमेंटमधून बंद प्लॅटमधून चोरट्यांनी १२ हजारांच्या रोकडसह दोन लाख १६ हजारांचे दागिणे लांबवल्याने नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील भगीरथ कॉलनी परिसरातील वक्रतुंड अपार्टमेंटमध्ये कांचन मधुकर कदम (वय २८) हे खाजगी नोकरदार असून कुटुंबासह वास्तव्याला आहेत. कदम कुटुंब गावाला गेल्याने प्लॅट बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 14 ते 16 एप्रिल दरम्यान घरफोडी केली. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी किचनमधील लहान लाकडी पेटीतून 12 हजारांची रोकड, 52 हजारांची सोन्याची पोत, 12 हजारांची मंगळसूत्राची पोत, एक लाख 80 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा गोफ, पाच हजार रुपये किंमतीचे चाळ असा एकूण दोन लाख 61 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. कांचन कदम या घरी आल्याने घरफोडीचा प्रकार लक्षात आला. जिल्हापेठ पोलिसात सोमवारी रात्री 12.30 वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील करीत आहे.