Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पवारांनी सोशल मीडियावरील ‘राष्ट्रवादी’चे नाव, चिन्ह असलेला वॉलपेपर हटवला !
    राजकारण

    पवारांनी सोशल मीडियावरील ‘राष्ट्रवादी’चे नाव, चिन्ह असलेला वॉलपेपर हटवला !

    editor deskBy editor deskApril 18, 2023Updated:April 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    महाविकास आघाडीमधील महत्वाचा पक्ष मानला जाणारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राज्यभर सुरु झाल्या आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या अफवा असल्याचे म्हणत स्वतः अजित पवार, शरद पवार आणि महाविकास आघाडीतून जोरदार खंडन सुरू आहे. असे संशयाचे चित्र असताना आज अजित पवार यांनी सोशल मीडियावरील पक्षाचे नाव आणि चिन्ह असलेला वॉलपेपर हटवला. त्यामुळे हे धुके गडद झाले आहे.
    शरद पवार यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन अजित पवार नाराज नाहीत. ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय धुळवड सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी रंगताना दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या बातम्या अफवा असल्याचे सांगत स्वतः अजित पवारांपासून ते शरद पवारांपर्यंत सारेच जण खंडन करत आहेत. मात्र, तसे कृत्य होताना दिसत नाही. कारण अजित पवार यांनी कालचे कार्यक्रम ऐनवेळी रद्द केले. मात्र, असे कार्यक्रम नव्हते, असा खुलासा स्वतः अजित पवार यांनी केला. त्यानंतर आता सोशल मीडियावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले वॉलपेपर हटवलेत. त्यामुळे ही चर्चा पुन्हा सुरू झाली.

     

    अजित पवार यांच्या फेसबुक पेज खात्याचे वॉलपेपर कोरे आहे. त्या खात्याच्या एंट्रोमध्ये विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असा उल्लेख आहे. आज या पेजवर दोन फेसबुक पोस्ट केल्यात. त्यातली एका पोस्टमध्ये ‘भारतमातेच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक, थोर सेनानी तात्या टोपे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!’ असा उल्लेख करून तात्या टोपे यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये महर्षी धोंडे केशव कर्वे यांना अभिवादन केले आहे. त्यात ‘महिलांचे शिक्षण आणि त्यांचे हक्क व विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घालणारे थोर समाजसुधारक, ‘भारतरत्न’ महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!’ म्हटले आहे. या पोस्टच्या फोटोवरही राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आहे.

    अजित पवार यांच्या ट्विटर हँडलवरही विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असा परिचय आहे. सोबतच फेसबुकवर टाकलेल्याच दोन्ही पोस्ट आहेत. या फोटोवर पक्षाचे चिन्ह आहे. मात्र, ट्विटरच्या पेजवरही पक्षाचे नाव, चिन्ह असलेला वॉलपेपर नाही. त्यामुळे अजित पवार खरेच नाराज आहेत का? नसतील तर मग पक्षाचे चिन्ह आणि नाव असलेला वॉलपेपर दोन्ही अकाउंटवर का नाही? अशी चर्चा सुरूय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.