लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेने भाजप बंडखोर नगरसेवकाच्या मदतीने सत्ता मनपाची सत्ता काबीज केली होती याप्रकरणी आयुक्तांची नोटीस बजाविण्यात आल्या त्यानंतर बंडखोर नगरसेवका पैकी तीन नगरसेवकांची घर वापसी झाली आहे त्यामुळे पुन्हा मनपा मध्ये एकदा पुन्हा सत्तातराचे नाटक सुरू झाले आहे.
मनपावर भाजपची एक हाती सत्ता असताना काही भाजपाच्या बंडखोर नगरसेवकांनी शिवसेनेशी हात मिळवणी करून भाजपची सत्ता पडली होती व मनपावर भगवा फडकविला होता मात्र याबाबत भाजपने आयुक्तांकडे तक्रार केली होती त्याची नोटीस 8 रोजी सर्वांना बजावण्यात आली होती या नोटिशी नंतर प्रभाग तीन मधील नगरसेवक सुरेश सोनवणे ,शोभा बारी,अशिनाभी शेख, हे आ शिरीष महाजन , आ राजू मामा भोळे, आबा कापसे, महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी , भगत बालानी, अश्विन सोनवणे याच्या उपस्थितत स्वगृही परतले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना नगरसेवक सुरेश सोनवणे लाईव्ह महाराष्ट्र न्यूजशी बोलताना ते म्हणाले की आम्ही भाजपच्या तिकिटावर निवडणुक आलो आहोत त्यामुळे आम्ही भाजपचे नगरसेवक आहोत आणि आमचे गटनेते हे भगत बालनी आहे गट नेते म्हणून भगत बालनी याना स्वीकारतो आम्ही भाजप सोडली नव्हती त्यामुळे घरी परतण्याचा विषय नाही मात्र जे बंडखोर नेते आहे त्यांनी भाजपच्या अधिकृत नगरसेवक नोटीस दिली.
सत्ता येऊन सहा महिने झाली आहे काहीच कामे झाले नाही जी कामे सुरू होती ती सुद्धा बंद पडली आहे कोणालाही जळगावकारांचे काहीच घेणे देणे नाही आहे. जो तो आप आपले बघत आहे त्यासाठी आम्ही स्वगृही आलो आहोत पूर्वी सुद्धा आम्ही भाजपात होतो आणि आता सुद्धा भाजपात आहोत असे ते म्हणाले.