मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या पक्षांतरांचे वारे वाहू लागले आहेत. तर अजित पवार यांच्या पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याची चर्चा रंगली आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चेनंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. धनंजय मुंडेंचे दोन्ही नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.
दरम्यान धनंजय मुंडे हे काल देखील संभाजीनगरला जाऊन आले आहेत. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. याबाबतची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.