जळगाव : प्रतिनिधी
गणपती नगरातील एका किराणा दुकानाला रविवारी सकाळी ६.३० वाजता आग लागून व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या पथकाने व परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांग व्यावसायीक राजेंद्र खिवसरा हे गेल्या तीस वर्षांपासून हे दुकान चालवित होते. या दुकानातून मिळणाऱ्या उत्प्नान्नातून खिवसरा आपले व भाचीच पोट भरत होते. सकाळी नेहा किराणा जनरल स्टोर्स दुकानाला शॉटसर्किटमुळे आग लागली.नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन केला. तसेच स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी आल्यानंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. वाहन चालक युसुफ पटेल, फायरमन पन्नालाल सोनवणे, नितीन बारी, नंदकिशोर खडके, संतोष पाटील, मोहन भाकरे यांनी आग आटोक्यात आणली. नागरिकांनी गर्दी केली होती