• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलीस भरतीत व्हाट्सअप वर कॉपी करण्याचा प्लॅन फसला : अन्..तिघांवर गुन्हा दाखल झाला

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 9, 2021
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
पोलीस भरतीत व्हाट्सअप वर कॉपी करण्याचा प्लॅन फसला : अन्..तिघांवर गुन्हा दाखल झाला

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव पोलीस शिपाई भरती परीक्षेचा आज लेखी पेपर होता. यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा केंद्रात व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले.

याप्रकरणी कॉपी करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे तर दुसरा गुन्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, पोलिस शिपाई भरती २०१९ची प्रक्रीया सुरू झाली आहे. यात जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर १२८ पदांसाठी आज ९ ‘क्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता जळगाव व भुसावळ शहरातील ६८ केंद्रांवर २१ हजार ६९० उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी लेखी परिक्षा घेण्यात आली. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही परीक्षा केंद्र होते. याठिकाणी योगेश रामदास आव्हाड (रा.पांझनदेव, पोस्ट.नागापूर जि.नांदगाव) या परीक्षार्थी तरुणाने परीक्षा केंद्रात नजर चुकवून मोबाईल आणला होता. योगेशने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आपल्या एका मित्राला पाठवली. त्यानंतर त्याच्या मित्राने प्रश्नांची उत्तर सोडवून त्याला पाठवायला सुरुवात केली. हा प्रकार सपोनि देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर योगेशला तात्काळ परीक्षाकेंद्राच्या बाहेर नेत चौकशी करण्यात आली. याप्रकरणी योगेश रामदास आव्हाड आणि त्याचा मित्र (नाव निषपन्न नाही) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे कळते.

दरम्यान,जळगांव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुल,जळगांव येथील परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी उमेदवार प्रतापसिंग गुलचंद बालोद बैठक क्रमांक ७२१७०५९ हा परीक्षेत गैरप्रकार  करत असतांना निदर्शनास आला आहे. सदरहू परीक्षार्थीवर देखील गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.



परिक्षा केंद्रावर मोबाईल, आक्षेपार्ह वस्तूंना होती बंदी

परिक्षा केंद्रावर पेन, पेन्सील, रबर, प्रवेशपत्र व शासकीय कामकाजासाठी ग्राह्य असलेले फोटोचे “ळखपत्र ऐवढ्याच वस्तु उमेदवारांनी आणने अपेक्षित होते. मोबाईल, आक्षेपार्ह वस्तुंना बंदी घालण्यात आली होती. या वस्तु आणल्यास उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येणार होते.

जळगांव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर १२८ पोलीस शिपाई पदांच्या रिक्त पदांसाठी सुरु करण्यात आलेली आहे. पोलीस शिपाई भरती-२०१९ मधील आवेदन अर्ज सादर केलेल्या एकूण २१६९० उमेदवारांसाठी जळगांव व भुसावळ शहर या ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर पोलीस शिपाई भरती-२०१९साठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती.सदरहू परीक्षेचा पेपर सकाळी ११.०० वाजता सुरु करण्यात आला व दुपारी १२.३० वाजता संपविण्यात आला.

लेखी परीक्षेकरिता बोलाविण्यात आलेल्या एकुण २१६९० उमेदवारांपैकी ११५३६ उमेदवार लेखी परिक्षेकरिता हजर होते व १०१५४ उमेदवार लेखी परिक्षेकरिता गैरहजर होते. सदरहू परीक्षेकरीता ५३.१८ टक्के उमेदवार उपस्थित होते.

अंदाजे पेपर संपल्यानंतर २ तासांनतर दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी परीक्षेची उत्तर तालिका जळगांव जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरहू परीक्षेच्या उत्तरतालिकेबाबत काही हरकती आक्षेप असल्यास प्रभारी पोलीस उपअधीक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२५१००६१ व पोलीस भरती मदत कक्षाचा हेल्पलाईन नं. ०२५७-२२३३५६९ वर हरकती/आक्षेप असल्यास पाठविता उद्या सकाळी ०९.०० वाजेपर्यंत पाठविता येऊ शकतात. किंवा जळगांव पोलीस अधीक्षक कार्यालयाचे ईमेल आयडी sp.jalgaona mahapolice.gov.in वर पाठविता येतील.

सदर परिक्षेचा निकाल जळगांव पोलीस दलाचे वेबसाईटवर दिनांक १०/१०/२०२१ प्रसिध्द करण्यात येणार आहे. खालील दोन घटनांचा अपवाद वगळतापोलीस शिपाई भरती परीक्षा अत्यंत सुरळीतपणे पार पडलेली आहे.

Previous Post

भवरखेड्यात जिवाजी महाले जयंती उत्साहात साजरी !

Next Post

आ.गिरीश महाजन यांच्या उपस्थित भाजप नगरसेवक स्वगृही परतले !

Next Post
आ.गिरीश महाजन यांच्या उपस्थित भाजप नगरसेवक स्वगृही परतले !

आ.गिरीश महाजन यांच्या उपस्थित भाजप नगरसेवक स्वगृही परतले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group