धरणगाव : प्रतिनिधी
राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असतांना देखील जिल्ह्यातील येणाऱ्या निवडणुकीत मात्र भाजप शिवसेना व राष्ट्रवादीचे संजय पवार यांची अजब युतीच जिल्ह्यात दिसू लागल्याने जिल्ह्यातील राजकीय चर्चेला उधान आले आहे. त्यांनी आता सहकार पॅनलच्या माध्यमातून अनेक गावांना भेटी देण्याचे काम सुरु केल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहे.
पोखरी तांडा, एकलग्न, आव्हाणी, टाहकळी, दोनगाव बु व खु, फुलपाट, कवठळ, चोरगाव, धार ,शेरी, पथराड बु व खु शिवसेना – भाजपा राष्ट्रवादी पॅनलने आज पाळधी जिल्हा परिषद गटात सर्व गावांना भेटी गाठी दिल्या या वेळी उपस्थित मध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, भाजपा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुदाम पाटील, भाजपा नेते शिवदास पाटील, किशोर राघो पाटील, संजय माळी, प्रमेराज पाटील, आबा माळी, सुरेश पाटील, यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्य चेअरमन यांना विनंती केली की सहकार पॅनल ला मतदान करा व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील, मंत्री गिरीश महाजन, आ.चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार , पीसी आबा पाटील, सुभाष आण्णा पाटील , संजय माळी यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल निवडणूक लढत आहे.