पारोळा : प्रतिनिधी
बस स्थानकावर एक महिला गाडीत चढत असताना, अज्ञात महिलांनी पर्समधून सत्तावीस ग्रॅम सोने व सात हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा मनोहर पाटील या लग्नानिमित्त म्हसवे येथे माहेरी आल्या होत्या. लग्नसमारंभ आटोपून पुढील कार्यक्रमानिमित्त पाचोरा येथे जाण्यासाठी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास पारोळा बस स्थानकात आल्या असता, बस स्थानकात बस (एमएच ४०एन९०६५) ही पाचोरा जाण्यासाठी आली असता, बसच्या दिशेने भरपूर गर्दी जमली. या गर्दीचा फायदा घेत, महिलेच्या गळ्यात असलेल्या पर्समधून अज्ञात महिलेने २७ ग्रॅम सोन्याचे दागिने व सात हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.