Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दरोड्यातील आरोपींना सोडण्यासाठी दुसऱ्या दरोड्याची तयारी !
    अमळनेर

    दरोड्यातील आरोपींना सोडण्यासाठी दुसऱ्या दरोड्याची तयारी !

    editor deskBy editor deskApril 15, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना अमळनेर शहर व परीसरात काही अज्ञात आरोपी है आगामी काळात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याबाबात खात्रीशिर गोपनिय बातमी मिळाली होती त्यावरुन त्यांनी त्यांचे अधिनिस्थ पोलीस अधिकारी व अमलदार यांना अधिक सतर्क व सक्त गस्त करणे परीसरात सतत गस्त करणे, पोलीस स्टेशन हद्दतील हॉटेल, ढाबे, लॉजेस इ. वारंवार चेक करुन तेथे येणा-या जाणा-या इसमांची माहीती ठेवणेबाबत व अशा इतर अनेक उपयुक्त सुचना दिल्या होत्या.
    वरील सुचनाप्रमाणे दि. १०/०४/२०२३ रोजीच्या रात्रगस्त अंमलदार पोहेकॉ संजय पाटील, पोहेकॉ / अरुण बागुल, पोहेकॉ / किशोर पाटील, पोहेका / कपिल पाटील, पोहेकॉ / सुनिल पाटील, पोना / योगेश पाटील, पोकों/शेखर साळुंखे, पोकों/गणेश पाटील, पोकाँ/जितेंद्र निकुंबे असे अमळनेर शहरात सतर्क व सक्त गस्त करीत असतांना त्यांना रात्री ०३.३० वाजेच्या सुमारास हॉटेल बलराम लगतचे कोप-यात काही मोटर सायकल व ०६ इसम हे अंधारात दबा धरून बसलेले दिसले वरील रात्रगस्तीचे अंमलदार हे त्यांचे बाजुने जात असतांना त्यांची चाहुल लागताच ते अंधाराचा फायदा घेवुन त्यांचेकडील दोन मोटर सायकल वर ०५ इसम पळुन गेले व एका इसमास जागीच पकडले. पकडलेल्या इसमास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव जगदीश पुंडलिक पाटील रा. पिंपळकोठा ता. पारोळा जि.जळगांव असे
    १) दिनेश भोई २) प्रेम पाटील ३) अजय अंबे तिघे रा. पिंपळकोठा ता. पारोळा जि. जळगांव ४) करडाणे पुर्ण नांव माहीत नाही ५) भटु दिलीप पाटील रा. पैलाड अमळनेर असे सांगितले. तसेच जगदीश पुंडलिक पाटील याच्या ताब्यात एक बजाज सिटी एक्स मोटर सायकल, एक धारदार चाकु, मिरची पुड, नायलॉन दोरी, लोखंडी टामी, व मोबाईल असे साहीत्य मिळुन आले आहे. वरील सर्व आरोपीतांवर अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. १२२/२०२३ भा.द.वि. ३९९, शस्त्र अधिनियम ४ / २५, मु.पो. अधि. १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    त्यांनतर जगदीश पाटील यांस पोलीस स्टेशनला आणल्यावर विचारपुस करता त्यांने अमळनेर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे – सागर संजय पाटील रा. पैलाड, अमळनेर याने त्याचा चुलत भाऊ भटु पाटील रा. पैलाड, अमळनेर यांस मा. अति. जिल्हा व सत्र न्यायालयात त्याच्या गु.र.न. ४८० / २०१९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यांत सुटका करण्यासाठी पैश्यांची व्यवस्था करणे बाबत सांगितले होते सदरची बाब ही भटु दिलीप पाटील यांने आम्हाला सांगितल्याने आम्ही वरील सर्वानी मिळुन दोराडा टाकण्याचा कट रचला. त्यांनतर दिनेश भोई याची मोटार सायकल घेवून सुमठाणे मार्गे येत असताना मोटर सायकलच्या दोन्ही बाजुकडील नंबर प्लेटवर चिखल लावुन अमळनेर शहरात आलो बाबत हकीगत सांगितली आहे कोठे दरोडा टाकणार होते याबाबत काहीएक सांगितलेले नाही.
    असाआद्याप पावेतो सदर गुन्ह्यांत १) जगदीश पुंडलिक पाटील २) दिनेश पिंटु सोनवणे ३) प्रतिम रविंद्र पाटील सर्व रा. पिंपळकोठा ता. पारोळा जि.जळगांव ४) भटु उर्फ अमोल मधुकर पाटील उर्फ गांगुर्डे रा. शिवाजी नगर पैलाड अमळनेर अशांना अटक करण्यात आली असुन सध्या वरील आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांडवर आहेत.

    पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली पो. हे को.  सुनील पाटील , पो.ह.संजय पाटील, पो ह कपिल पाटील योगेश पाटील शेखर साळुंखे गणेश पाटील पो जितेंद्र निकुंभे. पो ह अरुण बागुल यांनी हि कारवाई केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव वाहनाच्या धडकेत कपडे विक्रीसाठी जाताना व्यावसायिक ठार !

    December 21, 2025

    भाजप उमेदवाराकडून ठाकरे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न !

    December 20, 2025

    मालवाहू वाहनाच्या धडकेत ट्रॅक्टरवरील मजुराचा बळी

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.