Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कानून के हाथ लंबे होते हैं..33 वर्षे लागले मात्र पोलिसांनी त्याला शोधलच…
    क्राईम

    कानून के हाथ लंबे होते हैं..33 वर्षे लागले मात्र पोलिसांनी त्याला शोधलच…

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 14, 2023Updated:April 14, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पो.नि. उद्धव डमाळे यांनी आखला प्लान पोहेकॉ. पवारांसह कोळीनी अशी केली अटक…

    प्रतिनिधी धरणगाव तालुक्यात गेल्या ३३ वर्षांपासून भावाच्या खुनात आरोपी असलेल्याला फरार आरोपीला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कैलास रूपसिंग पाटील (वय ५५) असे नाव असून त्याला धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी प्लान करीत यावर पोहेकॉ. पोहेकॉ मोती पवार आणि राजेंद्र कोळी यांनी गुजरात राज्यातील नवसारीतून अटक केली आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, तब्ब्ल ३३ वर्षापूर्वी कैलास पाटील याने आपल्या चुलत भावाचा खून केला होत. तेव्हापासूनच तो फरारी होता. कोर्ट प्रत्येक तारखेला पोलिसांना आरोपी अटक का नाही?, याची सतत विचारणा करत होते. त्यामुळे धरणगाव पोलिस मागील ३३ वर्षापासून आरोपीला अटक करण्याच्या मुद्द्यावरून मोठ्या दबावात होते. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,चोपडा भागाचे कृषीकेश रावले यांनी पो. नि.उद्धव ढमाले यांनी पदभार सांभाळल्यापासून या प्रकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पो.नि. ढमाले यांनी पोहेकॉ मोती पवार आणि राजेंद्र कोळी यांना तपासाबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. आरोपी कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्यासाठी पोहेकॉ मोती पवार आणि राजेंद्र कोळी हे देखील मागील एक महिन्यापासून अनेक ठिकाणी फिरत होते. त्यानंतर अखेर एका गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा नवसारी येथे असल्याची कळाले.

    पो. नि.उद्धव ढमाले यांनी पोहेकॉ मोती पवार आणि राजेंद्र कोळी यांना तात्काळ गुजरातला जाण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार दोघं कर्मचारी नवसारी येथे पोहचले. स्थानिक पोलिसांची मदत घेतल्यानंतर पोहेकॉ पवार आणि कोळी यांनी सापळा रचून त्याला अलगद ताब्यात घेतले. गुजरात मधील कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर आज रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक आरोपी सोबत धरणगाव येथे पोहोचणार आहे. दरम्यान, तब्बल ३३ वर्षापासून फरार आरोपीला धरणगाव पोलिसांनी शोधून काढल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे आरोपी फरार असल्यापासून तो गावातील आपल्या कुटुंबियांच्या देखील संपर्कात नव्हता. त्याचा कोणताही मोबाईल नंबर उपलब्ध नव्हता. तरी देखील धरणगाव पोलिसांनी आरोपीला शोधून काढले हे विशेष ! तपासकामी एपीआय जीभाऊ पाटील, पीएसआय संतोष पवार,राजेंद्र पाटील, राहुल बोरसे, जितेंद्र भदाणे, गोपनीय विभागाचे मिलिंद सोनार, विनोद संदानशिव यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.