विशेष पोलीस उपमहानिरिक्षकांची कारवाई
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: – जिल्हयातील धरणगाव शहरानजिक असलेल्या परिसरातील कमल जिनींग मीलमध्ये रेशनमालाचा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचा पेेट्रोलिंगवर असताना आलेल्या फोनवरून नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने छापा टाकल्यानंतर दोन दिवसांची पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यात रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ११.६३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यात रेशनमालाचा काळाबाजार होत असून एका ठिकाणी रेशनमालाचे पॅकींग केले जात असल्याच्या माहितीवरून विशेश पोलीस उपमहानिरिक्षक यांनी छापा टाकून रेशनमाल जप्त करण्यात आला. या रेशनमालाचा पंचनामा करतेवेळी कमल जिनींग प्रेसिंग आवारात असलेला धान्यसाठ्याची रेशनमालात भेसळ करून विक्रीसाठी नेत असल्याचे आढळून आले.
यात महाराष्ट्र शासनाचा शिक्का असलेल्या पॅकींग धान्य गोण्यांसह मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आदि शासकिय रेशनमालाचे बारदानाचे गठ्ठे आढळून आले आहेत. या रेशनमालाचा काळाबाजार होत असल्याचे संदर्भात स्थानिक महसूल प्रशासनाला सूचित केले होते. महसूल प्रशासनाने कोणतेही सहकार्य तर केले नाहीत शिवाय तेथे आढळून आलेल्या एमएच २८ एबी ८१९५ या गहू व तांदूळ भरलेल्या वाहनांसंदर्भात जप्त रेशनमालाचा साठा पंचनामा करतेवेळी जिनींग फॅक्टरीत असलेला निलेश नामदेव मुसळे धरणगाव व शेख अमीर शेख बुढन मलकापूर ट्रक चालक यांना विचारणा केली असता त्यंाचेकडूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
यात मुसळे याने सांगीतले की सदर तांदूळ व गव्हाचा साठा माझा असून वाहतूक करण्यासाठी शेख अमीर कडे दिला आहे. तर अमीर याने सांगीतले कि, हा धान्याचा साठा ओम ट्रेडर्स व ए.बी.संघवी धुळे तसेच निलेश ट्रेडींग मराठे यांच्याकडील आहे असे संदिग्ध संागीतले. तर गोडावून देखिल भाड्याने घेतले असल्याचे यांनी सांगीतले. यात तालुका पुरवठा अधिकारी यास उपस्थित रहाण्याविषयी निर्देश देउन पंचनाम्यासाठी आवश्यक असणारे प्रिंटर लॅपटॉप वा अन्य साहित्यानिशी पंचनामा केला.
दरम्यान गोडावून करारनामा पाहीला असता हस्तलिखीत असून छापा टाकला त्याच दिवसाचा असून नोंदणीकृत नसल्याचेही दिसून आले असून रिकामे तसेच भरलेले शासकिय बारदान व आढळून आलेला धान्यसाठा याची भेसळ करत असल्याची खात्री झाली आहे. यात ट्रक व गोडावून असे दोन्ही ठिकाणचे गव्हाचे ५० किलोचे २५० कट्टे १५ रूपये किलोने तसेच सरकारी किंमत ३ रूपये प्रति किलोनुंसार अंदाजित किंमत १० लाख रूपये, तांदूळ ५० किलो वजनाच्या ७८ गोण्या १५ रूपये प्रतिकिलो नुसार व शासकिय किंमत ३ रूपयेनुसार असे सुमारे ११ ते १२ लाख रूपये किमतीचा रेशनमाल तसेच विविध राज्य शासनाचे रिकामे कट्टे असून यात रेशनमालाची भेसळ करून विक्रीसाठी नेत असल्याचे दिसून आले असल्याचे पंचनाम्यात पोलीस नाईक २१९२ प्रमोद मंडलिक, सहायक फौजदार २२७७ बशीर गुलाब तडवी, यांनी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी म्हटले आहे.