Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाच मुलाच्या बापाने तीन मुलीसह आईला पळविले ; राज्यात रंगली चर्चा !
    क्राईम

    पाच मुलाच्या बापाने तीन मुलीसह आईला पळविले ; राज्यात रंगली चर्चा !

    editor deskBy editor deskApril 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    दररोज अनैतिक संबंधातून पळून गेलेल्या लोकांच्या अजब-अजब घटना समोर येत असतात. पण सध्या राजस्थानमधील अशाच एका घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. या घटनेबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत. सीकर शहरात राहणाऱ्या एका विवाहित महिला आपल्या तीन मुलींना घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. साधारण 4 दिवस शोधाशोध घेतल्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही तर महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. धक्कादायक बाब म्हणजे महिला ज्या प्रियकरासोबत पळून गेली तो 5 मुलांचा पिता आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, सीकर शहरात राहणारी 38 वर्षीय एक विवाहित महिलेला शेजारी राहणारा मुकेश नायक नावाची व्यक्ती पळवून घेऊन गेला. विवाहितेसोबत तिच्या तीन मुली ज्यांचं वय 17, 12 आणि 5 आहे त्या सुद्धा गेल्या आहेत.

    कुटुंबियांनी याबाबतची तक्रार पोलिसात दिली होती. पण कोणतीही कारवाई झाली नाही तेव्हा कुटुंबिय बुधवारी पोलीस अधीक्षकाच्या ऑफिसमध्ये पोहोचले आणि एसपीना त्यांनी सगळी घटना सांगितली. कुटुंबियांनी सांगितलं की, ज्या मुकेशसोबत विवाहित महिला गेली आहे तो 5 मुलांचा पिता आहे. अशात त्याला पोलिसांनी लगेच अटक करावी आणि विवाहितेला त्याच्या तावडीतून सोडवावं. कुटुंबिय म्हणाले की, त्यांना मुलींची चिंता सतावत आहे. त्यांच्यासोबत तो काहीही करू शकतो.

    ज्या मुकेश नायकसोबत विवाहित महिला गेल्याचं समोर आलं तो एका नेत्याचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे. कुटुंबियांनी सांगितलं की, राजकीय वजन असल्याने पोलीस याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करत नाहीयेत. तर पोलीस अधीक्षक करण शर्मा यांनी कुटुंबियांना सांगितलं की, पोलिसांची एक टीम यावर काम करत आहे आणि लवकरच विवाहित महिलेला कुटुंबियांकडे सोपवलं जाईल. पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.