जळगाव : प्रतिनिधी
शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. यावर आता पोलीस प्रशासनाने कारवाई करीत अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावत आहेत. शहरातील श्याम नगरमधून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आल्याची घटना १२ रोजी उघडकीस आली असून वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, शहरातील श्यामनगर ते हरीविठ्ठल नगरात अवैधरित्या वाळूची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे होत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी बुधवारी १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता श्याम नगर परिसरात कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले. ट्रॅक्टर चालक समाधान खंडू सोनवणे रा. श्रध्दा कॉलनी, जळगाव याच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही त्यामुळे पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल अजय सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक समाधान खंडू सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक रेवानंद साळुंखे पुढील तपास करीत आहे.