जळगाव : प्रतिनिधी
शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या आव्हाने रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी जीनिग बाजूला एक वेअर हाऊसचा खुलेआम भाड्याने दिल्याची चर्चा दोन दिवसापासून जिल्ह्यात सुरु होती. त्यावर आज थेट संबधित अधिकारी यांनी पाहणी करीत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
शहरातून आव्हाने रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी जीनिगच्या बाजूला असलेले लक्ष्मी कृषी उत्त्पन्न खाजगी बाजार आव्हाणे शेतकऱ्याच्या मालासाठी गोडावून याठिकाणी असलेली भली मोठी जागा हि शहरात होणाऱ्या पिंप्राळा उड्डाणपुलाच्या गुजरात येथील कंपनीला भाड्याने दिल्याने तालुक्यातील शेतकरीना मात्र भर उन्हाळ्यात माल ठेवण्यासाठी जागा मिळत नाही, मात्र या वेअर हाऊसचे जे मालक आहे. त्यांनी कशी काय हि जागा भाड्याने देत आपली उत्पन्न जणू सुरु केले आहे. अशी तालुक्यातील शेतकऱ्यामध्ये चर्चा आहे. यावर सहकार विभाग कारवाई करेल कि वेअर हाऊस मालकाची पाठराखण करणार यातून वेअर हाऊसच्या मालकाला लाखो रुपयाचे मासिक भाडे सुद्धा मिळत असल्याची चर्चा शेतकरीमध्ये जोरदर सुरु आहे. पण दि १२ रोजी लाईव्ह महाराष्ट्र न्यूजवर आलेल्या बातमीची दखल घेत अधिकारी यांनी थेट घटनास्थळी जात पाहणी करीत चौकशी करण्याचे आदेश दिले असून लवकरच यावर कारवाई होणार असल्याचे देखील चर्चेत समोर आले आहे.
हि जागा खाजगी बाजारासाठी असल्याने त्याच कामासाठी वापर व्हायला हवा होता मात्र तसे झालेले नाही त्याची चौकशी करून अहवाल पाठविण्यात आल्यावर योग्य ती कारवाई करणार आहे.
– संतोष बिडवई, डीडीआर, जळगाव