जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील शिंदे व भाजप सरकार शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देत असताना जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याना मात्र वाऱ्यावर सोडले कि, काय असा प्रश्न निर्माण होत आहे, शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या आव्हाने रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी जीनिग बाजूला एक वेअर हाऊसचा खुलेआम भाड्याने दिल्याने आज देखील जिल्ह्यातील शेतकरीना माल साठवणूक करण्यासाठी जागा नाही. यावर सहकार विभाग कारवाई करेल का ?
शहरातून आव्हाने रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी जीनिगच्या बाजूला असलेले लक्ष्मी कृषी उत्त्पन्न खाजगी बाजार आव्हाणे शेतकऱ्याच्या मालासाठी गोडावून याठिकाणी असलेली भली मोठी जागा हि शहरात होणाऱ्या पिंप्राळा उड्डाणपुलाच्या गुजरात येथील कंपनीला भाड्याने दिल्याने तालुक्यातील शेतकरीना मात्र भर उन्हाळ्यात माल ठेवण्यासाठी जागा मिळत नाही, मात्र या वेअर हाऊसचे जे मालक आहे. त्यांनी कशी काय हि जागा भाड्याने देत आपली उत्पन्न जणू सुरु केले आहे. अशी तालुक्यातील शेतकऱ्यामध्ये चर्चा आहे. यावर सहकार विभाग कारवाई करेल कि वेअर हाऊस मालकाची पाठराखण करणार यातून वेअर हाऊसच्या मालकाला लाखो रुपयाचे मासिक भाडे सुद्धा मिळत असल्याची चर्चा शेतकरीमध्ये जोरदर सुरु आहे. या प्रकरणी तत्काळ सहकार, पणन विभागाने व बिडवई काय कारवाई करतात याकडे तालुक्यातील शेतकरीचे लक्ष लागून आहे.