Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ठाकरे-पवारांच्या भेटीवर शरद पवारांचा खुलासा !
    राजकारण

    ठाकरे-पवारांच्या भेटीवर शरद पवारांचा खुलासा !

    editor deskBy editor deskApril 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    भाजपला अनुकूल वक्तव्ये करणाऱ्या शरद पवारांच्या खेळीमुळे अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्रीच ‘सिल्व्हर ओक’वर धाव घेतली. तिथे उद्धव, शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे व संजय राऊत या चौघांमध्ये सुमारे सव्वातास खलबते झाली. आता या विशेष भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    तिन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला असला तरी चर्चेचा अजेंडा वादग्रस्त मुद्द्यांबाबतचाच असल्याची माहिती दोन्ही पक्षांतील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसचा सहभाग नव्हता. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलेले असताना संजय राऊत, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केला आहे. शरद पवार म्हणाले, आपापल्या पक्षाची भूमिका वेगवेगळी असली तरी महाविकास आघाडी म्हणून त्यातील सर्व पक्षांनी एका विचाराने काम करावे या मताशी आमची चर्चा झाली आहे. त्यानुसार काही कार्यक्रम आखले आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आमचे ठरले असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

    संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ अशी बैठक झाली. बैठकीत राजकीय घडामोडींवर, भविष्याची दिशा ठरवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत सकारात्मकचर्चा झाली. मविआचे ऐक्य अबाधित ठेवणे हा चर्चेचा अंजेडा होता. महाविकास आघाडीबाबत जाणुनबुजून गैरसमज पसरवले जात आहेत. महाविकास आघाडी घट्ट आहे. काँग्रेसशीही आमचा संवाद सुरू आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांमध्ये चांगला संवाद आहे. तसेच, काँग्रसचे महासचिवही येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. सुप्रिया सुळे ठाकरे-पवार भेटीवर म्हणाल्या, मी या बैठकीत उशीरा सहभागी झाले. माझी मुलगी इंग्लंडवरुन आलेली आहे. ती पुढे काय करणार, तिचे करियर आमच्या मुलांच्या भविष्याबाबत चर्चा झाली. कौटुंबिक विषयांवर यावेळी बोलणे झाले. मी पूर्णवेळ त्यांच्या चर्चेत नव्हते. माझी आणि उद्धवजींची ताडोबावर चर्चा झाली. मला नात्यातला ओलावा मला महत्त्वाचा वाटतो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.