प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील वसंत वाडी येथील ग्रामपंचायत मध्ये कोरोना लसीकरण कार्यक्रम होणार आहे या क्रमांक कार्यक्रमाला जि प सदस्य पवन सोनवणे यांचे सहकार्य लाभले आहे.
तालुक्यातील वसंतवाडी येथे सकाळी 9 वाजेला लसीकरण कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे लसीकरण केंद्रावर 250 डोस उपलब्ध होतील ज्या नागरिकांना पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाली आहे भाषणच दुसरा डोस देण्यात येणार आहे लसीकरण केंद्रावर येताना आधार कार्ड मोबाईल नंबर आणि आवश्यक आहे तसेच या ठिकाणी या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहेआरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
येथील ग्रामपंचायत मध्ये उद्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच म्हसावद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सागर नाशिककर, डॉ प्रशांत गर्ग व डॉ अग्रवाल सर सहकार्याने आणि जि.प.सदस्य पवनभाऊ सोनवणे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम होणार आहे.
लसीकरण केंद्रावर जळके आरोग्य उपकेंद्र सि.एच.ओ.थोरात मॅडम,ए.एन.एम.सपकाळे मॅडम, आरोग्य सेवक सलीम भाऊ पिंजारी तसेच आशा वर्कर जयश्री पाटील, गोजर पाटील, सरीता पाटील, अनिता धनगर व वच्छला चव्हाण इत्यादी कर्मचारी उपस्थित राहतील त्यांना ग्रामपंचायत शिपाई रामेश्वर चव्हाण तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण व उपसरपंच ईश्वर चव्हाण तसेच गौर सेना सदस्य मदत करतील.