धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील गोशाळेत असलेल्या १९ वर्षीय महिलेवर २१ वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात असलेल्या गोशाळेत चोपडा तालुक्यातील महिला कामास आहे. याठिकाणी दि ११ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी राकेश बारेला(वय २१) हा महिलेजवळ येत चुकीचे वर्तन केल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात महिलेने धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.गजानन महाजन हे करीत आहेत.