अमळनेर : प्रतिनिधी
शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला असून, पिंपळकोठा येथील सराईत गुन्हेगाराला दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर शहरात ११ रोजी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, हेडकॉन्स्टेबल अरुण बागुल, योगेश पाटील, शेखर साळुंखे, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे हे दुचाकीने गस्त घालत असताना धुळे रोडवर बलराम हॉटेल जवळ कोपऱ्यात पाच ते सहा जण दुचाकीसह संशयास्पद बसलेले आढळून आले. पोलिसांना संशय येताच ते त्यांच्या दिशेने विचारपूस साठी जाऊ लागताच सर्वजण पळू लागले. पोलिसांनी जगदीश पुंडलिक पाटील (२१, पिंपळकोठा, ता. पारोळा) याला त्याच्या मोटारसायकलसह अटक केली. त्याच्या मोटारसायकलच्या नंबर प्लेटवर चिखल लावलेला आढळून आला.
त्याच्याजवळील पिशवी तपासली असता त्यात दोन चाक मिरचीची पद नायलॉन दोरीचे बंडल, गाडीला लोखंडी टॅमी असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. आरोपी जगदीश याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने त्याचे साथीदार दिनेश भोई, प्रेम पाटील, अजय अंबे (तिन्ही पिंपळकोठा) तर करडोणे (पूर्ण नाव माहीत नाही) (मुंबई), भटू दिलीप पाटील (पैलाड, अमळनेर) यांच्यासह दरोडा टाकण्याच्या प्रयत्नांत असल्याचे सांगितले. इतर आरोपी मोटारसायकलने पळून गेले होते. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या आदेशाने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र फरार आरोपी सापडू शकले नाहीत. पोलिसांनी मोटारसायकल (एमएच १९ ईबी ९६३) तसेच दरोड्याचे साहित्य, दोन मोबाइल असा एकूण ७४ हजार ६०० रुपयांचा मदेमाल जप्त केला.