भुसावळ : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक महिलासह युवतींची सोशल मिडीयाच्या माध्यमातून फसवणूक होत आहे. अशीच एक घटना भुसावळ तालुक्यातील खडका येथील माधुरी मयूर पाटील (वय २२) या रेझिन आर्टचे काम करतात. त्यांना दोघांनी फ्रेमची ऑर्डर दिली. आणि पैसे देण्याच्या नावाखाली एक लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.६ रोडी माधुरी पाटील यांना त्यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप कॉल व मेसेज करून १५ फोटो फ्रेमची ऑर्डर देण्यात आली. माधुरी पाटील यांनी यासाठी २०,४९५ रुपयांची मागणी केली तुमच्याकडे आलेला क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. त्या कोडच्या माध्यमातून फिर्यादी यांना दुप्पट पैसे परत करण्याच्या नावाखाली माधुरी पाटील यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे हे करीत आहे.