मुंबई : वृत्तसंस्था
देशातील अनेक नेत्यांना धमकीचे फोन येत आहे. केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील धमकी आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
मी एकनाथ शिंदेंना उडवणार आहे, असा धमकीचा फोन आल्यानंतर पुण्यात प्रचंड खळबळ उडाली . सोमवारी रात्री आरोपीने 112 या हेल्पलाईनवर कॉल करून धमकी दिली. मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे असे म्हणून त्यांनं फोन बंद केला. पोलिसांना युध्दपातळीवर तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. राजेश मारूती आगवने असे आरोपीचे नाव असून तो मुंबईतील धारावी परिसरात राहतो.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री 112 या पोलिसांच्या हेल्पलाईनवर कॉल आला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार असल्याचे फोनवर सांगण्यात आले. पोलिसांनी युध्दपातळीवर तांत्रिक तपासास सुरूवात केली. धमकीचा कॉल पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरातून आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी राजेश आगवनेला तात्काळ ताब्यात घेतले. तो दारूच्या नशेत असल्याचे समोर आले. छातीत दुखत असल्याने सोमवारी रात्री 12 वाजता राजेशने सर्वप्रथम 112 वर कॉल करून रूग्णवाहिका पाठवा असे कळविले. त्यासाठी नियंत्रण कक्षातून त्याला 108 ला कळवा असे सांगण्यात आले. त्याने दुसर्यावेळी त्याच क्रमांकावर कॉल केला. त्यावेळी त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
राजेश मारूती आगवने हा वॉर्डबॉय म्हणून काम करत असून तो मुंबईच्या धारावी परिसरात रहायावस आहे. त्याची पत्नी पुण्यातील कोथरूड परिसरात एका खासगी ठिकाणी काम करते. तिला भेटण्याकरिता तो महिन्यातून 2 वेळा येतो. सोमवारी पत्नीला भेटण्यासाठी आल्यावर त्याच्या छातीत दुखत होते. त्यावेळी त्याने 112 वर कॉल करून रूग्णवाहिका पाठवा असे सांगितले होते. त्याला 108 वर कळवा असे सांगितल्यानंतर देखील त्याने परत 112 वर कॉल करून धमकी दिल्याचे समोर आले आहे.