• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बॉलीवूडच्या भाईजानला पुन्हा धमकीचा फोन ; अशी सांगितली ओळख !

editor desk by editor desk
April 11, 2023
in क्राईम, राज्य
0
बॉलीवूडच्या भाईजानला पुन्हा धमकीचा फोन ; अशी सांगितली ओळख !

मुंबई : वृत्तसंस्था 

गेल्या काही महिन्यांपासून देशातील नामवंत बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमक्यांचे फोन येत आहेत. आता पुन्हा एकदा सलमानला धमक्यांचे फोन आले आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीनं यावेळी थेट मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षेत फोन केला होता.
सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानला धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीनं सलमानला 30 तारखेला मारणार असल्याचं देखील सांगितलं आहे. फोन करणारी व्यक्ती ही गौरक्षक जोधपूर राजस्थान येथील असून त्या व्यक्तीनं स्वत:ची ओळख रॉकीभाई असी करून दिली आहे.

या फोनमुळे सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सलमान खानला याआधी फोन आणि मेलवर धमक्या आल्या. गँगस्टर लॉरेंन्स बिश्नोईचा या धमक्यांमागे हात असल्याचं म्हटलं जात आहे. मी केवळ धमक्या देत नाही तर त्या धमक्या मी लवकरच आमलात आणेल असं लॉरेंन्स बिश्नोईनं म्हटलं आहे. सलमान खानला सतत येणाऱ्या धमक्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 10 एप्रिलला सलमानचा किसीका भाई किसीकी जान हा सिनेमा देशभरात प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या रात्रीच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला सलमानच्या धमकीचा फोन आला आहे. याआधी 18 मार्चला सलमान खानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकरला धमकीचा ई-मेल आला होता.

ज्यात सलमान खानशी बोलायचं असल्याचं म्हटलं गेलं होतं. रोहित गर्ग नावानं हा मेल आला होता. गोल्डू बरारला तुझ्या बॉसबरोबर बोलायचं आहे. त्याने इंटरव्ह्यू पाहिला असेल वाटतं. नसेल त्याला पाहायला सांग. मॅटर क्लोज करायचा आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर बोलणं करून दे. समोरासमोर बोलायचं असेल तर तसंही सांग. आधीच इन्फॉर्म केलं आहे. दुसऱ्या वेळेत थेट झटका मिळेल. सतत येणाऱ्या धमक्यांनंतर सलमान खाननं बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. या महागड्या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सलमाननं खरेदी केलेली बुलेटप्रूफ कार भारतीय बाजारपेठेतही लाँच झालेली नाही. आपल्या जिवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सलमान खानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

भाजपच्या मंत्र्यांवर उद्धव ठाकरेंनी सोडले टीकास्त्र !

Next Post

संतापजनक : मृत्यू झालेल्या महिलेचा घेतला अंगठा ; व्हिडीओ व्हायरल !

Next Post
संतापजनक : मृत्यू झालेल्या महिलेचा घेतला अंगठा ; व्हिडीओ व्हायरल !

संतापजनक : मृत्यू झालेल्या महिलेचा घेतला अंगठा ; व्हिडीओ व्हायरल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group