• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिवसेनेच्या मालमत्तेसह निधी आता शिंदेंच्या हाती ?

editor desk by editor desk
April 10, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
“राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घ्या!”

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील ठाकरे गट व शिवसेनेच्या शिंदे गटाचा वाद आता वाढला असून यात शिंदे गटाने ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. कारण देखील तसेच काही आहे. शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी प्रमुखांकडे सोपवा अशी मागणी करणारी याचिका अॅडव्होकेट आशिष गिरी यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टात ही याचिका करण्यात आलीय.

पक्षाचा निधी आणि स्थावर मालमत्ता सध्याच्या प्रमुखांकडे देण्याची मागणी करण्यात आलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल योग्य असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे. शिवसेना भवन, पक्षाचा निधी आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात असं या याचिकेत नमुद करण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाचा निकाल योग्य
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला देण्याचा निकाल सुनावला होता. याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल योग्य असल्याचं आशिष गिरी यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, या याचिकेबरोबरच आपल्या याचिकेवर एकत्र सुनवाणी घ्यावी अशी मागणीही गिरी यांनी केली आहे.

आपला कोणत्याही पक्षाशी संबंध नसून आपण केवळ कायद्याच्या बाजूने असल्याचं गिरी यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय दिला तर नाव, चिन्ह सर्व त्यांना देण्यात यावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागला तर शिंदे गटाला सर्व मिळावं पण निकाल लागेपर्यंत पक्षाच्या निधी वापरावर निर्बंध लावण्यात यावे, असं गिरी यांनी याचिकेत म्हटलं आहे.
दरम्यान,या याचिकेशी शिंदे गटाशी काहीही संबंध नसल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. आम्ही पहिल्यांदा सांगितलं आहे, शिवसेना भवन मंदिर आहे, आम्हाला त्यांनी घडवलं आहे आम्हाला भवन आणि संपत्ती नको, कुणी याचिका दाखल केली असेल तर याचिका आणि आमचा संबंध नाही, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणार नाही, याचिका आणि आमचा संबंध नाही. आमचा त्या वकीलाशी संबंध नाही, हे पाप आम्ही करणार नाही अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे. शिवसेनेची चल आणि अचल मालमत्तेसंदर्भात सुप्रीम कोर्टात जी याचिाक दाखल झाली त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही असं शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

Previous Post

जळगावात दोघांना मारहाण ; गुन्हा दाखल

Next Post

अमळनेर तालुक्यात दोन दुचाकीची धडक ; एक जखमी !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

अमळनेर तालुक्यात दोन दुचाकीची धडक ; एक जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group