जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील शाहू नगरात शुल्लक कारणाने दोन भावांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन तरुणाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगरातील हनुमान मंदीराजवळ मयुर रानवडे हे आपल्या परिवारासोबत वास्तव्याला आहे. याच परिसरात समीर बिहारी आणि सुमेर तडवी यांना सोईस्कर जाण्या येण्यासाठी दुसरा रस्ता असतांना दोघे मयूरच्या घरासमोरून जातात. त्यामुळे त्यांच्या घरात असलेली मुलगी घबरते. दरम्यान, ८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घराकडून का जातात असा जाब मयूर व त्याचा भाऊ कल्पेश यांनी विचारला. याचा राग आल्याने समीर बिहारी आणि सुमेर तडवी या दोघांनी प्लास्टीकचा पाईपाने दोन्ही भावांना बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी रविवारी ९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मयुर रानवडे याने दिलेल्या फिर्यादीवरून समीर बिहारी आणि सुमेर तडवी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उल्हास चऱ्हाटे करीत आहे.