जळगाव ; प्रतिनिधी
शहरातील मेहरुण तलाव ट्रॅक परिसरामध्ये बाईकवर स्टंटबाजी करणे विद्यार्थ्यांना महागात पडले आहे. या अल्पवयीन स्टंटबाज विद्यार्थ्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि ९ रोजी रविवारी सकाळी स्टंटबाजीचा प्रकार खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पाहिल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, समाधान टहाकळे, राकेश बच्छाव यांनी पाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गणेश शिरसाळे हे करीत आहे.