धरणगाव : प्रतिनिधी
येथील विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, तसेच विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने १५ ते २१ एप्रिलदरम्यान स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटीया, सचिव आर.एन. महाजन यांनी गुरुवारी दिली.
हा कार्यक्रम बालकवी ठोंबरे विद्यालयात होणार असून, त्यात महाराष्ट्रातील नामांकित वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम शाळेच्या पटांगणावर संध्याकाळी ८:३० वाजता सुरू होईल. तरी शहर व तालुका परिसरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटीया व सचिव आर. एन. महाजन यांनी केले आहे.
या कार्यक्रमात १५ एप्रिल रोजी मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर विषयावर अक्षय जोग, पुणे, १६ एप्रिल रोजी सामाजिक राष्ट्रवादाचे जनक महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर रमेश पांडव, संभाजीनगर, १७ एप्रिल रोजी जीवन सुंदर आहे, या विषयावर गणेश शिंदे पुणे यांचे व्याख्यान होणार ११८ रोजी हवामानावर आधारित शेती काळाची गरज, या विषयावर पंजाबराव डख पाटील परभणी, १९ रोजी थोरले राजे सांगून गेले, या विषयावर रवींद्र चव्हाण पाटील पाचोरा, २० रोजी गुगल आणि गुरुजी या विषयावर दिलीप बेतकीकर गोवा, तर शुक्रवार २१ एप्रिल रोजी मातृत्वाची हिमशिखरे या विषयावर प्रकाश पाठक धुळे यांची व्याख्याने होणार आहेत. यावेळी संचालक रघुनाथ चौधरी, ललित उपासनी, मुख्याध्यापक एस.एस. पाटील, जीवन पाटील, किशोर चौधरी, शिरीष बयस उपस्थित होते.