Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रियकरासह विवाहितेने दिले पतीला चहा अन घडले ते भयंकर !
    क्राईम

    प्रियकरासह विवाहितेने दिले पतीला चहा अन घडले ते भयंकर !

    editor deskBy editor deskApril 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात होणारे खून प्रत्येकवेळी हे प्रेमप्रकरणातून होत असल्याचे नेहमी समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना घडल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. प्रथम विवाहितेने आपल्या प्रियकरासह पतीच्या हत्येचा कट रचला आणि संधी मिळताच चहामध्ये विष पाजून त्याला मृत्यूच्या स्वाधीन केले.

    यामध्ये पतीचा मृत्यू झाला. महिलेने या प्रकरणाला आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे. मात्र या घटनेशी संबंधित मृत शाहिद खानचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरण उलघडलं. मृत्यूपूर्वी शाहिदने पत्नी, तिचा प्रियकर आणि पालकांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ बनवला होता. या व्हिडिओनंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकर आणि आईला अटक केली. या घटनेबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल सोनकर यांनी सांगितले की, पत्नीने प्रियकर आणि आई-वडिलांसोबत पतीला विष देऊन ठार केल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी सध्या सिव्हिल लाइन पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यास पोलिसांना वेळ लागला. यापूर्वी पोलीसही या प्रकरणाला आत्महत्या मानत होते. मात्र, मृताचे वडील सुरुवातीपासूनच हत्येची भीती व्यक्त करत होते. पीएम रिपोर्टमध्ये खुनाची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सर्वप्रथम मृतांच्या नातेवाईकांचे जबाब घेण्यात आले.

    पत्नीने प्रियकर आणि पालकांच्या संगनमताने मुलाची हत्या केल्याचा आरोप शाहिदच्या नातेवाईकांनी केला आहे. अशा स्थितीत पोलिसांनी सर्व संशयितांची कसून चौकशी केली. त्यानंतरच पोलिसांना यश आले असून आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला आहे. सध्या पत्नी, प्रियकर आणि आईला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे, तर वडील फरार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.