लखनऊ : वृत्तसंस्था
आयोध्येतील प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्यासाठी जाणार त्यांनी हेच दर्शन आज घेणार आहे. त्यांच्या समवेत ४० आमदार व भाजपचे काही मंत्रीसह आमदार देखील असल्याचे समजते. शनिवारी रात्री लखनऊ विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ४० आमदारांसह लखनऊत पोहोचताच ‘जय श्रीराम’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात शिंदेसेनेचे जंगी स्वागत करण्यात आले. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व आमदार आज अयोध्येसाठी लखनऊ विमानतळावरुन 9.30 वाजेच्या सुमारास निघतील. प्रथम हनुमान गढीवर पूजा करतील. दुपारी राम मंदिरात महाआरती करतील. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे भाजप नेतेही आज अयोध्येत दाखल होणार आहेत. शिंदेसेनेसह ते राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील.
एकनाथ शिंदेंसह शिंदे सेना काल रात्री लखनऊ विमानतळावर येताच भाजप नेते व कार्यकर्त्यांकडून त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यामुळे हा अयोध्या दौरा भव्यदिव्य करण्यासाठी भाजपही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी हिंदुत्वावर ठोस दावा करण्यासाठी तसेच उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. शिंदे गट हिंदुत्वाच्या अजेंड्यावर स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा प्रभावी भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे आज दिवसभर अयोध्येत असणार आहे. प्रभू रामासाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिराचा आढावा ते घेणार आहेत. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार यांच्या मुक्कामासाठी मंदिर नगरातील जवळपास सर्व हॉटेल, गेस्ट हाऊस आणि धर्मशाळा बुक करण्यात आल्या आहेत. शिंदे सरकारचे अनेक मंत्री आज सायंकाळपर्यंत अयोध्येत पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत राम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. एकनाथ शिंदे रात्री नऊ वाजेच्या सुमारास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. यादरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी शिंदे करण्याची शक्यता आहे.