जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसीतील डी सेक्टर येथील माहेर असलेल्या विवाहितेने माहेरून 50 हजार रुपये न आणळल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एमआयडीसी भागातील रहिवासी नयना प्रदीप राठोड (25) यांचा यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव करजगाव येथील प्रदीप शंकर राठोड यांच्याशी विवाह झाला आहे. नयना तिचे पती यांनी नयना हिच्या नणंदेकडून पन्नास हजार रुपये घेतले होते. या पैशांची परतफेड करण्यासाठी नयना हिने तिच्या माहेरून पन्नास हजार रुपये आणावेत, अशी मागणी पतीसह सासरच्या मंडळींनी केली तसेच या कारणावरून वेळोवेळी नयना तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून नयना ही माहेरी जळगाव येथे निघून आली. याबाबत नयना राठोड हिने शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती प्रदीप शंकर राठोड, सासू यशोदा शंकर राठोड, जेठ बलदेव शंकर राठोड, पूनम बलदेव राठोड, नणंद कविता राजू आढे (सर्व रा.पिंपळगाव पोस्टा करजगाव, ता.दारव्हा, जि.यवतमाळ) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहेत.