मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात शिंदे गटाची व ठाकरे गटाची एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक भाषणात बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका करत असतात. तर गुलाबराव पाटील त्यांच्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देताना पलटवार करत असतात. शनिवारी रायगड येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे नुकसान केले त्यांच्यासोबत तुम्ही बसला आहात असा टोला लगावला.
गुलाबराव पाटील म्हणाले, ज्या काँग्रेसने आम्हाला (शिवसैनिकांना) तुडवलं, ज्या काँग्रेसने आम्हाला संपवलं. ज्या राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. त्यांच्यासोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात. राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडल. आधी छगन भुजबवळ , त्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरेंना फोडलं. आज तुम्ही त्याच पक्षासोबत जाऊन बसलात, असा हल्लाबोल पाटील यांनी केला.
आमचा पक्ष फोडणाऱ्या सोबत जाऊन बसलेत आणि आम्हाला गद्दारांच्या रांगेत उभं केलं. पण उद्धव साहेब आम्ही 40-50,50-60 खटले आमच्या अंगावर घेऊन ही शिवसेना उभी केली आहे. 1992 च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बापही चार महिने तुरुंगात होतो. केवळ शिवसेना हा शब्द खाली जाता कामा नये यासाठी आम्ही बलीदान दिलं. शिवसैनिकांनी बलिदान दिल. त्या बलिदान देणाऱ्या शिवसैनिकांना तुम्ही गद्दार म्हणत असाल आणि गद्दारांच्या भरवशावर खासदार झालेल्या संजय राऊताला तुम्ही खुद्दार म्हणत असाल तर परमेश्वर तुमचं भलं करो, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केला.