Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
    आरोग्य

    वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 7, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा साथरोग काळात तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णांच्या उपचारासाठी व त्यांना बरे करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत.  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी सांगितले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे देशात उभारण्यात आलेल्या 36 हवेतून निर्माण होणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी देशभरातील पीएसए प्लांट बसविल्या गेलेल्या रुग्णालयांना ऑनलाईन संबोधित केले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उदघाटन श्रीफळ वाढवून व ऑक्सिजन मशीनची कळ दाबून करण्यात आले. यावेळी आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, प्र. प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले आदि उपस्थित होते.

    यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की,जिल्ह्यात अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारून जिल्हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणार असल्याचे ते  म्हणाले

    साथरोग तसेच कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत ऑक्सिजन रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत जीवरक्षक वायू ठरत आहे. जगभरात रुग्णांची संख्या वाढून त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज वाढली. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची जागेवरच निर्मिती व्हावी यासाठी पी एस ए ऑक्सिजन जनरेशन प्लांट ही संकल्पना निर्माण झाली. या प्लांटद्वारे हवेतुनच ऑक्सिजनची जागेवर निर्मिती केली जाते. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजनवर अवलंबून रहावे लागत नाही. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्लांट हा एक हजार लिटर प्रति मिनिट एवढा ऑक्सिजन निर्माण करू शकतो. याठिकाणी दिवसाला साधारण १.८७ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन निर्माण होईल. जो रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचा ठरेल. हा प्लांट पीएम केअर अंतर्गत डीआरडीओ व राज्य शासनाच्या मदतीने उभारण्यात आला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    विषबाधा झाल्याने ४७ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.