जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा आठवडे बाजार मुख्य रस्त्यावर शुक्रवारी एका ५६ वर्षीय इसमास मारहाण करीत मोबाईल लांबवत असतांना त्यांनी आरोडा ओरड केल्याने मोबाईल चोरटे पकडले गेले आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील दादावाडी परिसरातील रहिवासी असलेले लखीचंद वामन बडगुजर (वय ५६) हे मोबाइल दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना यांना चार जणांनी रस्त्यात अडवून मारहाण करीत त्यांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. दरम्यान, त्यांनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी तीन जणांना पकडले. मात्र, एक पसार होण्यास यशस्वी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंप्राळा आठवडे बाजार रस्त्यावर घडली असून, तिघांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. लखीचंद बडगुजर हे स्कूल बस हे चालवून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ते मोबाइल दुरुस्तीसाठी पिंप्राळ्यातील सोमाणी मार्केट येथे निघाले. पिंप्राळा आठवडे बाजार रस्त्यावरून जात असताना त्यांना चार तरुणांनी अडवून त्यांच्या खिशातील मोबाइल बळबजरीने हिसकाविला. मात्र, बडगुजर यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी लागलीच तीन जणांना पकडले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.